देश

बायजूच्या चार गुंतवणूकदारांकडून व्यवस्थापनाविरुद्ध खटला दाखल

बंगळुरू :  देशातील सर्वांत मोठी अ‍ॅडटेक कंपनी असलेल्या बायजू कंपनीच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या कंपनीच्या चार गुंतवणूकदारांनी कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गैरव्यवस्थापन आणि दडपशाहीचा आरोप करत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणमध्ये खटला दाखल केला आहे.त्यांनी कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना कंपनी चालवण्यापासून अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. या चार गुंतवणूकदारांनी बायजूचे फॉरेन्सिक ऑडिट व्हायला

Read more
देश

तृणमूल नेते शजाहान शेख संबंधित पश्चिम बंगालमध्ये छापे

कोलकाता : सक्तवसुली संचालनालयाने पोलिसांच्या मदतीने आज या धाडी टाकल्या. हावडा, बिजॉयगड आणि बिराटीसह शहरातील आणि आसपासच्या पाच वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने शुक्रवारी पहाटे छापे टाकले आणि विविध कागदपत्रांचा शोध घेतला. फसवून जमीन बळकावण्यासंदर्भात या धाडी टाकण्यात आल्या. सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने आज फरारी तृणमूल काँग्रेस नेते शजाहान शेख याच्याशी संबंधित व्यावसायिकांच्या घरांवर छापे टाकले. एका जुन्या

Read more
देश

२०२७ मध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

नवी दिल्ली : जेफरीजचे इंडिया इक्विटी विश्लेषक महेश नांदूरकर यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिले की, भारत गेल्या १० वर्षांपासून ७ टक्के वार्षिक विकास दराने वाढत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था $३.६ ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेसह आठव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर पोहचली आहे. भारतीय अर्थव्यवस्था पुढील चार वर्षांत ५ ट्रिलियन डॉलर्सची होईल आणि जर्मनी आणि जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरी

Read more
देश

एक देश, एक निवडणूक

नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक हे केंद्र सरकारचे प्रस्तावित धोरण प्रत्यक्षात लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्च स्तरीय समिती सोमवारी आजवर झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एक देश, एक निवडणूक या धोरणावर सविस्तर चर्चा करून या धोरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात

Read more
देश

सोनम वांगचुक उपोषण करणार?

लेह : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षण अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आजपासून उपोषण करणार होते. मात्र, नागरिकांच्या या मागण्यांबाबत काल केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात आली. याबाबत २६ फेब्रुवारीला लेहमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीतील निर्णयनांतर वांगचुक उपोषणाबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत. लडाखला

Read more
देश

नव्या १३ कारागृहांचा प्रस्ताव

नागपूर : राज्यात गेल्या काही वर्षांत कैद्यांची संख्या वाढल्याने राज्यात १३ नवीन कारागृहे बांधण्यात येणार आहेत. राज्यातील गुन्हेगारांच्या वाढत्या प्रमाणामुळे हा निर्णय घेण्यात आला असून यासाठी जमिन अधिग्रहित करण्यात आली आहे. हिंगोली, ठाणे, गोंदिया, जळगाव-भुसावळ, पालघर, तुर्भे, येरवडा, नगर-नारायणडोह, नांदेड, अलीबाग, बीड, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात नव्याने कारागृह उभारण्यात येणार आहेत. शासनाकडून जमीन अधिगृहित

Read more
देश

न्यायालयाने शेतकऱ्यांना फटकारले

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना शांततामय मार्गाने आंदोलन करायचे असेल तर आंदोलनात ट्रॅक्टर व ट्रॉलींचा वापर कसा काय केला जातो, अशा शब्दात आज पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुनावले आहे. शेतकऱ्यांना वाजवी निर्बंधांच्या अधीन राहून निषेध करण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने म्हटले. शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान हरियाणा व दिल्ली यांच्यातील सीमा सील करणे त्याचप्रमाणे अनेक

Read more
देश

विक्रमशिला महाविहारमध्ये ४२ वर्षांनंतर पुन्हा खोदकाम सुरू

पाटणा : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील अंतिचाक गावात असलेल्या प्राचीन विक्रमशिला महाविहारमध्ये पुरातत्व खात्याने ४२ वर्षांनंतर पुन्हा उत्खनन करण्यास सुरूवात केली आहे.विक्रमशिला महाविहार हे एक प्राचीन विद्यापीठ आहे. इसवीसन पूर्व आठव्या शतकात पाल साम्राजातील राजा धर्मपाल यांनी या विद्यापीठाची स्थापना केली होती. विक्रमशिला महाविहार विद्यापीठ इसवीसन पूर्व तेराव्या शतकामध्ये जमीनदोस्त झाले. त्यापूर्वी सुमारे चारशे वर्षे या

Read more
देश

शिक्षकांनो, निवडणूक कामावर रुजू होऊ नका! 

मुंबई :  दर पाच वर्षांनी निवडणुका आल्या की, शिक्षकांना नियमानुसार पाच दिवस निवडणुकीच्या कामासाठी जुंपले जाते. परंतु यावर्षी पाच दिवसांचा नियम मोडून शिक्षकांना उद्यापासून निवडणूक कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. तीन महिने शाळेत शिकवणे सोडून निवडणूक कामावर जाण्यास शिक्षक तयार नाहीत. त्यांच्या या संकटात मनसे मदतीला धावून आला आहे. एकाही शिक्षकाने निवडणूक कामावर रुजू होऊ

Read more
देश

अटल सेतू वरून शिवनेरी धावणार

मुंबई: शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या ” अटल सेतू “वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात आली असून प्रायोगिक तत्त्वावर उद्या दिनांक २० फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन -मंत्रालय(सकाळी ६.३०) व स्वारगेट- दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत. या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील.

Read more