मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, महाराष्ट्रात मानवी मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) चे एकही रुग्ण आढळलेले नाही, परंतु नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आरोग्य सेवा संचालनालयाने व्हायरसच्या जागतिक अहवालानंतर सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची रूपरेषा आखली आहे. एचएमपीव्हीबाबत महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या आरोग्य
Read moreमहाराष्ट्र
चीनमधील HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर
मुंबई : चीनमधून कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला होता.त्यांनतर चीनमध्ये आता नव्या व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. HMPV या नव्या व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. या आजाराची साथ चीनमध्ये पसरल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देश अलर्ट मोडवर आहेत. या HMPV व्हायरसमुळे आता महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. सर्दी आणि
Read moreजालना : क्रिकेट खेळताना ‘हार्ट अटॅक’मुळे मृत्यू
जालना : जालना जिल्ह्यात आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान एका 32 वर्षीय युवकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. विशेष म्हणजे आपल्या सहकारी फलंजासोबत बोलल्यानंतर काही क्षणांतच हा युवक खाली कोसळला. विजय पटेल असे मृत क्रिकेटपटूचे नाव असून तो मुंबईच्या नालासोपारा परिसरातील रहिवासी होता. जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आज सकाळी शहरातील
Read moreकॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक
भंडारा : महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज, रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर दुपारी भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक आणि कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुकळी येथे उपस्थित होते.
Read moreराज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापनेनंतर आता मंत्र्यांचे खातेवाटप पूर्ण झाले आहे. नव्या मंत्र्यांनी आपापल्या विभागाची सूत्रे स्वीकारताच प्रशासकीय फेरबदलांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर आज, मंगळवारी राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत अनेक अधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. मुंबईतील बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य
Read moreसरसंघचालक डॉ. मोहन भागवत बुधवारी चंद्रपूरात
चंद्रपूर : मागील 29 वर्षापासून विद्यार्थ्यांमध्ये सैनिकी मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव बुधवार दि. 25 डिसेंबर 2024 ला शाळेच्या परिसरात आयोजित होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ परमानंद अंदनकर व सन्मित्र मंडळाचे सचिव अँड. निलेश चोरे
Read moreफडणवीसांकडे गृह, दादांकडे अर्थ, शिंदेंना नगरविकास
राज्य मंत्रिमंडळाचे रखडलेले खातेवाटप अखेर जाहीर नागपूर : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर अखेर आज, शनिवारी राज्य मंत्रिमंडळाचे रखडलेले खातेवाटप जाहीर झाले. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह आणि ऊर्जा विभाग राहणार असून अजित पवारांकडे अर्थ खाते आणि एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात महायुतीला
Read moreछत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या स्कूल बसला आग
छत्रपती संभाजीनगर, 18 डिसेंबर : मागच्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका स्कूल बसला आग लागली आहे.जेव्हा ही आग लागली तेव्हाया बसमध्ये ३५ मुले होती. दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे या चिमुकल्यांचे जीव वाचला. ही घटना आज बुधवारी सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ
Read moreपरभणीत दगडफेक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू
परभणी : परभणीत ११ डिसेंबरला झालेल्या दगडफेक, जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी (वय ३५) असे असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. सोमनाथ सुर्यवंशी याचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. त्याचं शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात येणार आहे. या
Read moreरायगड : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ११ हजार ६१७ प्रकरणे निकाली
रायगड, 15 डिसेंबर : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण ११ हजार ६१७ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली.
Read more