महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या हिताचा विचार न करता इतर राज्यांसाठी फायद्याचे बजेट – वडेट्टीवार

मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय बजेटवर टीका करताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. वडेट्टीवार म्हणाले की, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या राज्यांना बजेटमध्ये अधिक लाभ मिळाले कारण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला. मात्र, महाराष्ट्राला या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही.

वडेट्टीवार यांनी विचारले की, देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक का दिली जाते? त्यांनी आरोप केला की, भाजप सरकार महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर वारंवार घाला घालत आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवण्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या हिताचा विचार न करता इतर राज्यांना फायद्याचे बजेट तयार केले जात आहे.वडेट्टीवार यांनी मतदारांना आवाहन केले की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी विचार करावा आणि भाजपा सरकारच्या या धोरणांविरोधात उभे राहावे.