मराठवाडा

विकासासाठी मोदी यांची मदत घेऊ

पुणे – लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सत्ताही स्थापन करण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने मोदींना समर्थन दिले. आता शरद पवार यांनीही बारामतीच्या विकासासाठी मोदींचीही मदत घ्यायला मागे-पुढे बघणार नाही, असे विधान केले आहे. बारामती येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यापारी मेळावा पार पडला.

Read more
मराठवाडा

हळदीला सोन्याचा भाव बियाणे दरात दुप्पटीहून वाढ

सांगली – हळदीच्या बियाणे दरात दुप्पटीहून वाढ झाली आहे. मागील वर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हळदीची लागवड कमी झाल्याने हळदीचे उत्पादन कमी झाले आहे . त्यामुळे हळदीच्या बियाणे दरात वाढ झाली. आता सांगली बाजारात आंध्र प्रदेशमधील सेलमहून हळदीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून गेल्या वर्षी ३,५०० रूपये असलेला दर यंदा ८,४०० रूपये क्विंटलवर

Read more
मराठवाडा

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची पूजा होणार!

सोलापूर – सहा ते एकवीस जुलै दरम्यान पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची आषाढी यात्रा होणार असून १७ जुलै रोजी पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे. यंदा दहा ते बारा लाख भाविक येण्याची शक्यता असून १५ जून पूर्वी पालखी मुक्काम ठिकाणी पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष

Read more
मराठवाडा

सिल्लोडजवळील शेतात अर्भकांचे अवशेष आढळले

मुंबई : छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिकनगरात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर महानगर पालिकेच्या पथकाने छापा मारल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे सिल्लोडपर्यंत पोहोचल्याचे प्रशासन, आरोग्य व पोलीस विभागाच्या कारवाईत स्पष्ट झाले. यामध्ये अवैध गर्भपात करून झाल्यानंतर मृत अर्भकाला सिल्लोडजवळील शेतात पुरून ठेवल्याचे उघडकीस आले. याप्रकरणात सतीश टेहरे, साक्षी सोमीनाथ थोरात, सविता सोमीनाथ थोरात,

Read more
मराठवाडा

आजारी जरांगे पाटलांची जलील यांनी घेतली भेट

छ. संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार न देता ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही त्यांना पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले होते. मराठवाड्यात मतदान शुक्रवारी (ता.२६) पार पडले. या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरल्याचे मतदानानंतरच्या चर्चेतून समोर येत आहे. जरांगे पाटील हे संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते रुग्णालयात दाखल

Read more
मराठवाडा

मतदान न करता कुऱ्हाडीने फोडले ईव्हीएम मशीन

नांदेड – मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाने मतदान केंद्रात प्रवेश करताच ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट व इतर साहित्याची कुऱ्हाडीने नासधूस केली. तरुणाच्या हातात कुऱ्हाड पाहून केंद्रावरील निवडणूक अधिकारी व इतर कर्मचारी आणि एजंट यांनी केंद्रातून बाहेर पळ काढला. तद्नंतर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतले. ही घटना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे घडली. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून

Read more
मराठवाडा

नांदेडची जागा भाजपसाठी सुरक्षित ?

नांदेड – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतरही नांदेड लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. नांदेडमध्ये भाजपचा खासदार आहे. तर गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढलेले आणि सव्वा चार लाख मतं घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले अशोक चव्हाणदेखील आता भाजपमध्ये आहेत. मात्र तरीही या मतदारसंघात भाजपची दमछाक होताना दिसत आहे. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र

Read more
मराठवाडा

केंद्राच्या विकास कामांचा लाभ महायुतीचे महादेव जानकरांनाच

परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांसाठी जनहिताची कामे केली आहेत. शेतक-यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना तर महिलांसाठी उज्वला गॅस योजना राबवली आहे. यासर्व विकास कामांचा लाभ परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना मिळणार असल्याचे मत केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केले आहे. महायुतीचे उमेदवार जानकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय

Read more
मराठवाडा

परभणीचे उमेदवार करोडपती

परभणी – रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी दि. १ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना फकिराची उपमा दिली होती. परंतु जानकर यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ते फकीर नव्हे तर करोडपती असल्याचे समोर आले आहे.  महायुतीच्या वतीने परभणी लोकसभेसाठी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर

Read more
मराठवाडा

परभणीतील उमेदवार वंचितने तिसऱ्यांदा बदलला

परभणी: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष जाहीर केलेले उमेदवार मागे घेऊन नव्या चेहऱ्यांची घोषणा करत आहेत. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आघाडीवर आहे. वंचितकडून घोषणा करण्यात आलेला तिसरा उमेदवार बदलण्यात आला आहे. वंचितने गुरुवारी परभणी लोकसभा मतदारसंघातील आपला उमेदवार बदलत नवा

Read more