मुंबई

आईस्क्रीममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा कंपनीतील कर्मचाऱ्याचा?

मुंबई – आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याच्या घटनेचा पोलिसांनी अखेर छडा लावला. आईस्कीमचे पॅकिंग करताना कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा अपघात झाला होता. त्यात त्याच्या हाताचे बोट तुटले होते. या कर्मचाऱ्याचा शोध घेऊन त्याची पोलिसांनी चौकशी केली. गेल्या महिन्यात आईस्क्रीम पॅकिंग करतेवेळी हा अपघात झाल्याचे चौकशीत समजले. काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालाड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने यम्मो कंपनीचे आईस्क्रीम

Read more
मुंबई

उज्ज्वल निकम यांची पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती

मुंबई – लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार राहिलेल्या उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. मात्र, भाजपकडून पराभव पचवल्यानंतरही उज्ज्वल निकम यांना सरकारने नव्याने बक्षीस दिले आहे. उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे,

Read more
मुंबई

केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅटट्रिक केल्यानंतर मुंबई रामदास आठवले यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे जाहले भव्य स्वागत*

चैत्यभूमी येथे फादर्स डे चे औचित्य साधत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले विनम्र अभिवादन मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सलग तीन वेळा केंद्रीय राज्यमंत्री पद भूषवत आहेत.तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर ना.रामदास आठवले यांचे आज प्रथमच

Read more
मुंबई

आईस्क्रीम कोनमध्ये सापडले मानवाचे बोट

मुंबई – मुंबईतील मालाड परिसरात एक भयंकर घटना समोर आली आहे. एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये चक्क मानवी बोट सापडले. यानंतर महिलेने मालाड पोलिस ठाण्­यात धाव घेत तक्रार दिलीअसल्याचे वृत्त आहे. मालाड परिसरातील एका महिलेने आईस्क्रीमची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला. यानंतर महिलेने मालाड पोलिस ठाण्यात धाव घेतली.. मालाड पोलिसांनी

Read more
मुंबई

मुंबई महापालिका विद्यार्थ्यांना आता छत्रीसाठी पैसे मिळणार

मुंबई – मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांंना यंदा पावसाळ्यात छत्री खरेदी करण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत. छत्रीचा पुरवठा करण्यासाठी कोणतीही कंपनी पुढे न आल्याने पालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना छत्रीसाठी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या शाळेतील पूर्व प्राथमिक ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना रेनकोट आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना छत्री दिली जाते. दोन वर्षासाठी हे वाटप

Read more
मुंबई

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

मुंबई – मुंबईकरांसह लाखो गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज भल्या सकाळी 6 वाजता मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे 91 वे वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या पाद्य पूजनानंतर मूर्तिकार लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरुवात करतात. याबाबत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने त्यांच्या सोशल अकाऊंटवर पोस्ट शेअर केली

Read more
मुंबई

डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देण्याची शिवसेना नेते, कार्यकर्त्यांची इच्छा – नरेश म्हस्के

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना पक्षाला मिळणारे मंत्रिपद डॉ. श्रीकांत शिंदे यांना देण्यात यावे, अशी इच्छा शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांच्या या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. नवी दिल्ली येथे आज शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के बोलत होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील

Read more
मुंबई

खासदार होताच दोन दिवसांतच सुरेश म्हात्रेंचा कपिल पाटलांशी पंगा

भिवंडी – भिंवडीतील शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी काल्हेर येथील शासकीय, वन विभागाची आणि स्थानिकांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप माजी खासदार कपिल पाटील यांच्या पुतण्यावर केला आहे. या प्रकरणातून त्यांनी थेट पाटलांशीच पंगा घेतल्याचे बोलले जाते आहे. त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत पाटीलही बाळ्या मामांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले

Read more
मुंबई

खा. नरेश म्हस्के अॅक्शन मोडवर; ठाणे रेल्वे स्थानकाची केली पाहणी

ठाणे – नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी पडेल्या राडारोडावरुन खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच फलाट क्रमांक ५ च्या रुंदीकरणाची पाहणी केली. पाहणी दौऱ्यात भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना ठाणे शहर शहरप्रमुख हेमंत पवार, शिवसेना कोपरी पाचपाखाडी शहरप्रमुख

Read more
मुंबई

मुंबईवर ठाकरे गटाचे वर्चस्व सिद्ध

मुंबई – मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांसाठी झालेल्या रोमहर्षक निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीने मुंबईत जोरदार मुसंडी मारत भाजपच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीचा धुव्वा उडवला आहे. दोन्ही काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने मुंबईत ४-२ ने महायुतीवर मात केली. उद्धव ठाकरे यांच्या

Read more