अमरावती- मागील कित्येक महिन्यांपासून दर्यापूर बसस्थानकांतील अस्वच्छता व आगार परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच ठिकठिकाणचे खड्डे पडलेले आहे त्यामुळे आगार परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा होते. परिणामी दर्यापूर आगाराला सध्या तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एवढेच नाही या पाण्यात आता साप सुद्धा निघू लागले आहे. त्यामुळे चालक ,वाहक आणि प्रवासी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दर्यापूर बसस्थानकांतील अस्वच्छता व आगार परिसरातील रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. बस स्थानकाकत मोठ मोठे गड्डे व त्या गड्ड्यात जमा झालेले पाणी यामुळे सध्या प्रवासी हेरान झालेले आहेत. यासंदर्भात आगार व्यवस्थापकांना वारंवार सूचना देऊनसुद्धा स्वच्छता व मोठमोठ्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर बसस्थानकांतील खड्ड्यांमुळे बसचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. भविष्यात याठिकाणी अप्रिय घटना सुद्धा घडू शकते. संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्यात यावी. खड्डे बुजविण्यात यावे अश्या मागणीचे पत्र आगार व्यवस्थापकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा पाठविण्यात आले आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही एस टी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.