अकोला

१६ डिसेंबर ला मुंबईच्या रेसकोर्सवर जागतिक बौद्ध धम्म परिषद

१२ डिसेंबर मूर्तिजापूर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समितीच्या वतीने जागतिक बौद्ध धम्म परिषद मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स वर शनिवार दिनांक १६ डिसेंबर ला दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून जागतिक बौद्ध धर्म गुरू दलाई लामा, समारोह समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रीय महिला नेत्या सीमाताई रामदास आठवले उपस्थित राहाणार आहेत. या धम्म परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन रिपाइं (आठवले) चे प्रदेश सह संघटक अशोक नागदेवे, जिल्हा अध्यक्ष सुनिल अवचार यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष अजय प्रभे यांनी केले आहे.

लग्नाची हळद सुकण्यापूर्वीच तरुणाची आत्महत्यासांगली : अजून लग्नाची हळदही सुकली नाही तोपर्यंत नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रकार जत तालुक्यात मुचंडी गावी मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद झाली असून आत्महत्येमागील कारणाचा शोध पोलीस करीत आहेत.परसा शिवानंद जालीहाळ (वय २६ रा. मुचंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पाच दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. लग्नाचे विधी पूर्ण झाल्यानंतर सकाळी तो घरातून बाहेर पडला. शोधाशोध केल्यानंतर सिंधी मळ्यात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत तो आढळला. त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जत पोलिसांनी आकस्मिक मृत अशी नोंद केली असून उत्तरीय तपासणीनंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.तरुणाच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी त्याला विवाह मान्य नव्हता. यामुळे त्यांने आत्महत्या केली असल्याची चर्चा सुरू आह