अकोला

बालविज्ञान परिषदेमध्ये प्रभातच्या दोन विज्ञान प्रकल्पांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

१२ डिसेंबर अकोला : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये प्रभात किड्स स्कूलच्या दोन विज्ञान प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे आयोजन दि. ०९ व १० डिसेंबर रोजी धनलक्ष्मी माध्यमिक शाळा, पाथर्डी फाटा, नाशिक येथे पार पडलेल्या ३१ व्या राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेमध्ये प्रभात किड्स स्कूल, अकोला यांच्या दोन विज्ञान प्रकल्पांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. वर्ग ७ च्या अनय पंकज बाच्छुका व आरना अलानी यांनी ’जलपर्णीपासून कागदाची निर्मिती‘ हा प्रकल्प विज्ञान शिक्षिका वर्षा वाकोडे यांच्या मार्गदर्शनात तसेच वर्ग ८ च्या वेदांत गडोदिया व प्रणिल नावकार यांची ’मत्सालयातील सांडपाण्याचा झाडांच्या वाढीवर परिणाम‘ हा प्रकल्प विज्ञान शिक्षक अमित जोशी यांच्या मार्गदर्शनात यशस्वीपणे सादर केला.

या विद्यार्थ्यांना विज्ञान विभागप्रमुख मिता इंगळे, उपप्रमुख वैशाली जोशी तसेच बालविज्ञान परिषद जिल्हा समन्वयक स्नेहल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे व उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे असून पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.