अकोला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध महिला पदाधिकार्‍यांच्या नियुक्या

महिला प्रदेशाध्यक्षा रोणीताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती

१२ डिसेंबर अकोला : महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांचे अकोला आगमन झाले असता महिला जिल्हाध्यक्ष सुषमाताई कावरे यांच्या घरी महिला पदाधिकारी यांच्या नियुत्तäया करण्यात आल्या. दि.१० डिसेंबर रोजी रोहिणीताई खडसे यांचे महिला जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी आगमन झाल्या प्रसंगी कावरे परीवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले.

त्यानंतर महिला संघटन कसे बळकट करता येईल याकरिता ताईंनी महिलांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रेरित केले. महिलांचे पक्ष संघटन बांधण्यासाठी रोहिणीताई खडसे, प्रदेश निरीक्षिका डॉ.आशाताई मिरगे, जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे यांच्या हस्ते काही महिला पदाधिकार्‍यांच्या नियुत्तäया करण्यात आल्या.

प्रियाताई विनोद विखे यांची तेल्हारा महिला तालुका अध्यक्ष पदी, प्रितीताई मोकळकार पातुर ता.अध्यक्ष पदी, राधाताई श्रीकृष्ण मांगटे बाळापूर ता.अध्यक्ष पदी, दिपालीताई देशमुख मुर्तिजापुर शहर अध्यक्षपदी, आशाताई गावंडे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी, जिल्हा सदस्यपदी पुष्पाताई पिंजरकर, जिल्हा सदस्य यमुनाताई खंडागळे, बाळापूर ता.उपाध्यक्ष रमाताई तायडे, शहर उपाध्यक्ष कनेजा परवीन, शहर सचिव शाहीन परवीन यांच्या नियुत्तäया करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा महासचिव पिंटूभाऊ वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष परीमलदादा लहाने, जिल्हा उपाध्यक्ष शामरावजी वाहुरवाघ, अजीजभैय्या, रामप्रभुजी तराळे, योगेशभाऊ, महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस सोनोने, शैलेशभाऊ बोदळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विद्यार्थी सचिव चेतनभाऊ नराजे, माजी प्रदेश सचिव ज्योतीताई कुकडे, सौ. मंगलाताई योगेश सोनवणे, माजी प्रदेश सरचिटणीस सुनिताताई ताथोड, महिला कार्याध्यक्ष अकिलाताई, माजी शहर अध्यक्ष रिजवानाताई, नाजीमाताई, जिल्हा महासचिव मनिषाताई महल्ले, जिल्हा उपाध्यक्ष कोकिळाताई वाहुरवाघ, प्रियाताई कावरे, सुवर्णाताई सपकाळ, चारुलताताई थेटे, वृंदाताई मंगळे, प्रितीताई सित्रे, जिल्हा सचिव चंदाताई चव्हाण, मालाताई रामटेके, नवनिर्वाचित महिला शहर अध्यक्ष सरलाताई वर्घट, असंघटित कामगार सेलच्या जिल्हाध्यक्ष अनिताताई दिघेकर, मुर्तिजापूर ता.अध्यक्ष रंजनाताई सदार, अकोला ता.अध्यक्ष संगिताताई दाळू, ओबीसी सेलच्या शहर अध्यक्ष पुनमताई मारकड, भारतीताई इंगोले, मोनालीताई तराळे, मंगलाताई सोनोने इ. उपस्थित होत्या.