ताज्या बातम्या

विश्वशांतीसाठी जगाला युध्द नको बुध्द हवा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

शेकडो बौध्द भिख्खूंनी वरळी ते महालक्ष्मी रेसकोर्स पर्यंत काढली विश्वशांती धम्म रॅली

मुंबई दि.15 : जगाला विश्वशांतीसाठी युध्द नाही तर बुध्द हवा आहे. तथागत भगवान गौतम बुध्दांनी मानवकल्याणासाठी अहिंसा,क्षमता,बंधुता,शांती या विचारांची गरज आहे. शांती अहिंसेचा पुरस्कार करणारा बुध्द विचार जगाला तारणारा आहे.त्यामुळेच आज विश्वशांती धम्म रॅली वरळी ते महालक्ष्मी रेसकोर्सच्या मैदानात जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या धम्म परिषदेला सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.पुज्य भदंत राहुल बोधी महाथेरो आणि शेकडो बौध्द भिख्खूंनी वरळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून महालक्ष्मी रेसकोर्स मैदानपर्यत आज विश्वशांती धम्मरॅली काढली. या धम्म रॅलीतुन उद्या दि.16 डिसेंबर रोजी होणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्स वरील जागतिक धम्म परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

या वेळी मोठ्या संख्येने बौध्द भीख्खु,उपासिका सहभागी होत्या.महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. वरळी ते महालक्ष्मी रेसकोर्स पर्यंत मोठ्या प्रमाणात बौध्द भिख्खूं च्या नेतृत्वात प्रंचड मोठी विश्वशांती धम्म रॅली काढण्यात आली.

नमो बुध्दाय,जय भिमचा नारा या रॅली मध्ये देण्यात आला. बौध्द धम्म संघ या त्रिरत्नांचा जयजयकार करण्यात आला.या रॅलीचा प्रारंभ वरळी येथे करण्यात येऊन समारोप महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात करण्यात आला.या रॅली मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले वरळी ते महालक्ष्मी रेसकोर्स पर्यत पूर्ण वेळ उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर,राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई अध्यक्ष सिध्दर्थ कासारे,अविनाश कांबळे; पद्मश्री कल्पना सरोज;दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे चांद्रबोधी पाटील; रिपाइं जिल्हा अध्यक्ष संजय पवार; भारतकुमार वानखेडे,सविता शिंदे,नागसेन कांबळे सचिनभाई मोहिते;; आदि मान्यवर उपस्थित होते.