अमरावती, 8 डिसेंबर : दर्यापुर-अमरावती रोड, दर्यापुर येथील रफत पेट्रोलपंप समोर गुरुवारी रात्री गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. यातील तर अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने मोठ्या शिताफीने पकडून दोन गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. तर या प्रकरणाची कसून चौकशी केली असता प्रकरण वेगळेच निघाले.
पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी नामे महेश जालमसिंग हरदे व जखमी पिडीत तरूणी यांची सोशल मिडीयावर (इंस्टाग्रामवर) ओळख झाली होती, आरोपी हा बंगलोर मध्ये प्रापर्टी ब्रोकर म्हणन काम करीत होता व जखमी ही अमरावती येथे शिक्षण घेत होती. त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली व आरोपी हा बंगलोर वरून अमरावती येथे वास्तव्यास आला व कठोरा नाका परिसरात घर भाडयाने घेवुन राहु लागला होता. आरोपी हा काही दिवसांपूर्वी पिडीत तरुणी हीचे अंजनगाव येथील घरी गेला व पिडीत तरुणी च्या आई-वडीलास म्हणाला होता कि, “मी तुमच्या मुलीसोबत लग्न केले आहे, तिला माझे सोबत पाठवा त्यावेळी त्यांने त्या दोघांच्या विवाह संबंधाचे कागदपत्रे सुध्दा दाखविली होती, परंतु पिडीत तरुणीने तिचे आईवडीलास ही बाब खोटी असल्याचे सांगुन विवाहाचे कागदपत्रे बनावट असल्याचे सांगितले. त्यानंतर पिडीत तरुणीचे आई वडीलांनी त्यास त्यांचे घरातुन निघुन जाण्यास सांगीतले. त्यानंतर आरोपी नामे महेश जालमसिंग हरदे याने पिडीत तरुणी व तीच्या आई-वडीलांच्या नावाने पो.स्टे. गाडगे नगर (अमरावती शहर) येथे तक्रार दिल्याने सदर तकारीचे चौकशी करीता दिनांक ०७ / १२ / २०२३ रोजी पिडीत तरूणी ही तिची आई वडील व परीचयातील गजानन हरपुळे सर्व रा अंजनगाव सुर्जी यांचेसह पो.स्टे. गाडगेनगर (अमरावती शहर) येथे आले होते. तेथील कामकाज संपल्यानंतर ते अमरावती ते अंजनगाव कडे जाण्याकरीता निघाले असता आरोपीतांनी दुचाकी व चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग करुन दर्यापुर नजीक त्यांचेवर चालत्या वाहनातून गोळया झाडल्या, त्यात पिडीत तरुणी हीच्या मानेला गोळी लागली तसेच गजानन हरपुळे सुध्दा जखमी झाले. त्यानंतर आरोपी हे १) बी.एम.डब्ल्यु. क्र. एम. एच ०२ ए. जे. ६११९ २ ) इनोव्ही क्रं. एम. एच १९ सी. एफ २११ ३) पल्सर दुचाकी वाहनाने घटनास्थळावरुन भातकुली मार्गे अमरावती शहर कारंजा लाड असे पळुन गेले होते.
पोलीसांनी त्वरीत सतर्कता दाखवून केलेल्या पाठलागाअंती आरोपी कारंजा लाड येथे स्था. गु.शा.अम.ग्रा. चे पथकास मिळुन आलेले आहे. गुन्हा करतेवेळी आरोपी महेश जालमसिंग हरदे सोबत १) श्रध्दा हरेल, वय २२) अजय चंद्रकांत पवार, वय ४५ सर्व रा मलकापुर व अन्य २ फरार साथीदार सोबत असल्याचे सांगीतले आहे. फरार आरोपी नामे १) आकाश चव्हाण २) पुरुषोत्तम राठोड ३) धनंजय दिधोरकर यांचा कसून शोध घेणे सुरु आहे. आरोपीतांना पुढील तपास कामी दर्यापुर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले असुन पुढील तपास दर्यापुर पोलीस करित आहे…