अकोला

खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावुन नोंदविला निषेध..!

मोताळा :  रस्ता व पुल हे विकासाचे प्रतीक मानल्या जाते,परंतु मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी ते पोफळी रस्त्यावरील कोल्ही गवळी गावा जवळील पूलाचे काम होऊन सात महिने पूर्ण झाले असून पुलाच्या आजूबाजूने मोठं मोठे खड्डे पडले आहे, अप्रोज काम अपूर्ण आहे त्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाशी वेळोवेळी संपर्क साधला असता अधिकारी व ठेकेदार उडवा उडीचे उत्तरे देऊन दुर्लक्ष करत आहेत.

पावसामुळे त्या ठिकाणी खड्डे पडून त्यात पाणी साचून चिखल निर्माण झाला आहे तसेच त्याठिकाणी रोज अपघात होत आहे जणू काही ते ठिकाण अपघाताचे माहेर घरच झाले. यामुळे संभाजी ब्रिगेड मोताळाच्या वतीने त्या खड्यांत बेशरमचे झाडे लावून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यात आला.

तसेच दोन दिवसात अपूर्ण काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेड मोताळा तालुका अध्यक्ष गणेश शिंदे पाटील,नंदू बोराळे,निना पाटील,गणेश बोराळे,मनोज बोराळे,गोपाल बोराळे, सोपान मख,विकास बोराळे,राजू पाटील,शंकर मुंदोकार उपस्थित होते