महाराष्ट्र

मनसेचे ट्वीट; शालिनी ठाकरेंच्या भूमिकेपासून मनसे चार हात दूर

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करत महाराष्ट्रद्रोही आणि भ्रष्टाचारी उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये, असा इशारा दिला होता. यानंतर आता मनसेकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

मनसे ट्वीट करताना परिपत्रकात म्हटले की, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी, महायुतीच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही, त्या उमेदवाराबद्दल आमची नाराजी आहे, अशी विधाने केली आहेत. पण ही विधाने पूर्णत: अप्रस्तुत आहेत. ती त्यांची व्यक्तीगत मते आहेत. त्यामुळे माध्यमांनी पण ही भूमिका पक्षाची भूमिका म्हणून बघू नये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे, असे स्पष्ट केले.