महाराष्ट्र

आपल्या कल्पनेतून एकतरी प्रकल्प बारामतीत आणला का?

बारामती – शनिवारी बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. “एक निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार सुनेला परकं म्हणाले. आज त्यांच्या घरातही मुली आहेत. त्या मुली उद्या सून म्हणून कोणाच्यातरी घरी जातील. कुणाचीतरी लेकी उद्या सून म्हणून त्यांच्या घरता येईल. मात्र, फक्त एक निवडणूक जिंकण्यासाठी कोणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर राजकारणात एवढी वाईट वेळ कुणावरही येऊ नये”, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांनाही लक्ष्य केलं. “मागच्या १५ वर्षात तीन वेळा खासदार राहिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या, जगप्रसिद्ध संसदरत्न यांनी आपल्या कल्पनेतून एकतरी प्रकल्प बारामतीत आणला का?” अशी खोचक टीका त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली. “एक निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार सुनेला परकं म्हणाले. आज त्यांच्या घरातही मुली आहेत. त्या मुली उद्या सून म्हणून कोणाच्यातरी घरी जातील. कुणाचीतरी लेकी उद्या सून म्हणून त्यांच्या घरता येईल. मात्र, फक्त एक निवडणूक जिंकण्यासाठी कोणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर राजकारणात एवढी वाईट वेळ कुणावरही येऊ नये”, असे ते म्हणाले.