अमरावती

अमरावतीमध्ये स्ट्रॉगरूमला; ईव्हीएमला त्रीस्तरीय सुरक्षा

अमरावती –  मतदानानंतर तब्बल ३९ दिवसांनी मतमोजणी असल्याने या कालावधीत विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनात स्ट्रॉगरूमध्ये ईव्हीएम कैद राहणार आहे. या स्ट्रॉगरूमला थ्रीलिअरची सुरक्षा राहणार आहे. पहील्या गेटवर महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून दुसऱ्या गेटवर एसआरपीएसची तुकडी तैणात राहणार आहे. तर तिसऱ्या गेटवर सीआयएसएफचे जवान पाहरा देणार आहे. याशिवाय ३९ दिवस येथे दैनदिन एसडीओ, तहसिलदार दर्जाचे दोन अधिकारी भेटी देणार आहे. अशा ७६ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात लोकसभेची निवडणुक २६ एप्रिल रोजी होऊ घातली आहे. मतदानाकरीता आता केवळ चार दिवस शिल्लक राहीले आहे. त्यामुळे आता प्रशासनाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघात १ हजार ८८३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता मतदानानंतर हे ईव्हिएम मशिन्स विद्यापीठ मार्गावर असलेल्या लोकशाही भवनातील स्ट्रॉग रूममध्ये ठेवले जाणार आहे. ४ जुन रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे २६ एप्रिल ते ३ जुन म्हणजे तब्बल ३९ दिवस ईव्हिएम या स्ट्रॉग रूममध्ये ठेवले जाणार आहे. या ईव्हिएमची स्ट्रॉग सुरक्षा प्रशसासनाकडून करण्यात आली आहे. थ्रीलिअरची सुरक्षा येथे राहणार आहे. पहील्या मुख्यव्दारवर स्थानिक पोलिसांचा पाहरा राहणार आहे. दुसऱ्या गेटवर एसआरपीएसफचे ७० जवान तैणात राहणार आहे. आतील गेटवर सीआयएसएफचे ३० जवान सुरक्षा देणार आहे. सोबतच दररोज सकाळी ९ व सायंकाळी ६ वाजता या दोन वेळी येथे एसडीओ, तहसिलदार दर्जाच्या ७६ अधिकाऱ्यांची नियुक्ती देण्यात आली आहे. एक अधिकारी एकटा येथे भेट देऊन पाहणी करणार आहे. त्या अधिकाऱ्याला आतमध्ये जाण्याकरीता एक कोड दिल्या जाणार आहे. हा कोट दाखवुनच त्यांना आतमध्ये एन्ट्री मिळेल. उद्या २४ एप्रिल पासुनच लोकशाही भवनात ही सुरक्षा तैणात होणार आहे.

स्ट्रॉंग रूम मध्ये ८५ सीसीटीव्ही
ईव्हीएमवर नजर ठेवण्याकरीता ८५ सीसीटीव्ही स्ट्रॉगरूमध्ये लावण्यात आले आहे. याशिवाय परिसरात २३ सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. अशा एकूण १०५ सीसीटीव्हीची नजर ईव्हिएम व परिसरातवर असणार आहे.