रामदास आठवले
राजकीय

संसदेत घुसखोरी करणा-यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 13- संसदेवर आतंकवादी हल्ला होवून त्यात शाहिद झालेल्या शहीदांच्या 22 व्या स्मृतिदिनी आज संसदेत काही जणांनी घुसखोरी करुन संसदेत गॅस हल्ला केला. संसदेत आपल्या बुटातुन लपुन आणलेल्या गॅस फोडुन गॅस अटॅक केला. संसदेत घुसखोरी करणा-या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.

संसद हे लोकशाहीचे मंदीर आहे. देशाचे प्रमुख स्थान आहे. या संसदेची सुरक्षा ही कडेकोट असली पाहिजे. संसदेच्या सुरक्षेत आज ही मोठी चुक झाली आहे. संसदेमध्ये घुसखोरी झाली ही संसदेच्या सुरक्षेतील फार मोठी चुक आहे. संसदेची सुरक्षा ही अधिक मजबूत कडेकोट केली पाहिजे अशी सूचना ना. रामदास आठवले यांनी केली आहे.

संसदेत घुसुन आंदोलन करणे , गेंधळ घालणे, गॅस अटॅक करणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. संसदेची सुरक्षा ही अबाधीत राहिली पाहिजे संसदेची सुरक्षा भेदून असा प्रकार करणे हा देशद्रोह आहे असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.