देश

भाजपाच्या हेमा मालिनी यांनी गव्हाच्या पिकाची कापणी केली

मथुरा- मथुरे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि खासदार हेमा मालिनी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात हेमा मालिनी निवडणूक प्रचारावेळी महिला शेतकऱ्यांसोबत गव्हाची कापणी करताना दिसल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीतही हेमा मालिनी यांनी शेतात कापणीचे काम केले होते.

हेमा मालिनी बलदेव विधानसभा मतदारसंघाच्या गढी गोहनपूर गावात प्रचार करत होत्या. त्याचवेळी अनेक महिला शेतकरी त्यांच्या शेतात कापणी करत होत्या. हेमा मालिनी त्यांना भेटायला शेतात गेल्या. त्यांना त्यांची तब्येत विचारली. यानंतर मतदान करण्याचे आवाहन करून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली. महिलांशी बोलल्यानंतर हेमा मालिनी यांनी त्यांच्याकडून विळा घेतला आणि त्यानंतर त्यांच्यासोबत गव्हाच्या पिकाची कापणी सुरू केली. हेमा मालिनी गव्हाचे पीक काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्या पिवळी साडी नेसून गव्हाच्या शेतात उभ्या आहेत आणि त्यांच्या हातात कापलेले गहू आणि विळा आहे. याशिवाय काही शेतकरी महिलाही शेजारी उभ्या आहेत.