महाराष्ट्र

‘बारामती’ची सून दिल्लीत जाणार

पुणे – ‘गेल्या निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमाकांची मते घेणारे उमेदवार; तसेच मतदारसंघातील इतर सर्वच नेते आपल्यासोबत आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये घरोघरी जाऊन मतदारांना मतदान केंद्रावर आणायचे आहे. मतदारांच्या आशीर्वादाने नवा इतिहास घडेल. या वेळी बारामतीच्या सूनबाई दिल्लीला जातील,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेवेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, ‘राष्ट्रवादी’चे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, दत्तात्रय भरणे, पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, माजी आमदार विजय शिवतारे; तसेच सुनेत्रा पवार उपस्थित होते. फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला ‘बारामतीच्या मनामनातील सूनबाई’ असा सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केला. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा सुरू केल्या.