अकोला

अकोल्यातील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचं कारण गुलदस्त्यात!

अकोला 8 डिसेंबर : अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या मोठ्या उमरीतील विठ्ठल नगरातील 19 वर्षीय तरुणीने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्त्या केली.

ही घटना 7 डिसेंबर रोजी सायंकाळी वाजता घडली, प्रियंका गणेश ठक्कर असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नावं असून,ती शहरातील एका सुपर शॉपी मध्ये कामाला होती.तीचे आई आणि वडील हे बाहेर राज्यात वास्तव्यास असून, मयत प्रियंका ही आजी आणि भावासह पाटील यांच्या वाड्यात भाड्याने राहत होती.

प्रियंका ही गळफास घेत आहे,हे शेजारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केले, परंतु दाराची कडी आतून बंद केली असल्याने, तिला वेळेत वाचविता आले नाही,दरवाजा तोडून आत प्रवेश केला,त्यावेळी उशीर झाला होता. प्रियांकाने आत्महत्त्या का केली,हे अजून गुलादस्त्यात असून, त्याचा तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत.