मुंबई

टेलर टीमच्या जहाल महिला माओवाद्याचे आत्मसमर्पण

गडचिरोली – नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला, एका वरिष्ठ जहाल महिला माओवादी कॅडरने गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता, कमांडर, टेलर टिम, डिव्हीसी, वय 36 वर्ष, रा. बोटनफुंडी, ता. भामरागड, जि. गडचिरोली असे आत्मसमर्पित माओवाद्याचे नाव आहे.महाराष्ट्र शासनाने रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

माओवाद्यांच्या गडचिरोली विभागाला संपूर्ण साहित्य पुरविण्याची जबाबदारी तिच्यावर होती.2006 मध्ये ती पेरमिली दलममध्ये भरती झाली होती.2007 पासुन सप्लाय टिम सदस्य म्हणुन काम करण्यास सुरुवात.2007-2008 मध्ये शिवणकला, कापड कटींंग व शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. 2008-14 मध्ये टेलरींग टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. 2014 मध्ये टेलर टिममध्ये कमांडर पदावर बढती होऊन आजपर्यत कार्यरत होती.2020 मध्ये पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.तर 2019 मध्ये नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिला एकुण 5.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.