नागपूर

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाताली वाघीण बेपत्ता

गोंदिया- वाघाचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी ताडोबा इथून आणलेल्या वाघिणीचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या तीन दिवसांतच ती वाघीण बेपत्ता झाली आहे. या वाघिणीवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी तिला सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावण्यात आले होते. मात्र नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना हे सॅटेलाईट नागझिरा अभयरण्यातील कक्ष क्रमांक ९५ मध्ये जमिनीवर पडलेले आढळले. त्यामुळे वाघीणीला शोधणे कठिण झाले आहे. नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी या वाघिणीचा शोध घेत आहेत. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचे संवर्धन स्थानांतरण उपक्रम दुसऱ्या टप्प्यात सुरू आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघीणीला (एनटी ३) ११ एप्रिल रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील नागझिरा अभयारण्याचे कक्ष क्रमांक ९५ मध्ये स्थानांतरीत करण्यात आले होते. मात्र ही वाघीण अवघ्या तीन दिवसांतच बेपत्ता झाली.