vyala
अकोला

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती ला आर्थिक मदत अभिनव उपक्रम

व्याळा:- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याळा येथील रहिवासी अत्यंत गरिबीची परिस्थिती जगत असलेल्या श्री.योगेश कृऱ्हाळे हे दुधर आजाराने ग्रस्त पीडित असल्याने त्यांना व्याळा ग्रामपंचायत सदस्य तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हा अध्यक्ष उज्ज्वल अंभोरे यांच्या कडून 2000 रूपयाची मदत दिली.

यावेळी गोपाल भाऊ वाकोडे शिवसेना सर्कल अध्यक्ष ग्रा.प.सदस्य शिवदास दादा सावरकार,श्रीकृष्ण भाऊ सोळंके ,माजी उपसरपंच विलास वानखडे , वंचित बहूजन आघाडी सर्कल अध्यक्ष संतोष भाऊ कात्रे गोपाल दादा वानखडे, सामाजिक कार्यकर्ते संघपाल वानखडे,शेख अलीम भाई , राजेश भाऊ मेहरे, संदिप भाऊ दामोदर,यासीन कुरेशी,आदी गावकरी उपस्थित होते.