अकोला

‘वंचित’ची भूमिका; स्वतंत्र लढणार?

अकोला : वंचित बहुजन आघाडी नेमकी काय भूमिका घेणार? याची उत्सुकता संपुर्ण राज्याला लागली आहे. याचसंदर्भातील अंतिम निर्णय आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर घेणार आहेत. पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर आपल्या पक्षाची लोकसभा निवडणुकीतील भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत राहणार? स्वतंत्र लढणार की तिसरी आघाडी स्थापन करणार? हे आजच्या पत्रकार परिषदेतून समोर येणार आहे.

मंगळवारी वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या कोअर टीमची बैठक पार पडली. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत राहणार? स्वतंत्र लढणार की तिसरी आघाडी स्थापन करणार? यावर आजच्या पत्रकार परिषदेत निर्णय होणार आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर आपली भूमिका पत्रकार परिषदेतून जाहीर करणार आहेत. पण त्यापूर्वी बुधवारी रात्री वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांची आंतरवाली सराटीत भेट घेतली. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, प्रकाश आंबेडकरांच्या मनात वेगळं काहीतरी चालल्याची शक्यता बळावली आहे. या दोघांच्या भेटीत अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.