अकोला क्राईम

मलकापूर शेत शिवारामध्ये तीन सायकलीसह २९ हजाराचे सागवान जप्त

पातुर वन विभागाची धडक कार्यवाही

१२ डिसेंबर पातूर : पातुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मलकापूर शेत शिवारामध्ये पातूर ते बेलतळा रस्त्यावर काही चोरटे सायकलवर सागवांची कटाई करून चोरी करत असल्याची भनक लागल्यावर पातुर वन विभागाचे कर्मचारी दबा धरून बसले होते त्याचवेळी सायकलवर सागवान घेऊन चोरटे जात असताना त्यांना पकडण्यासाठी दबा धरून बसलेले वन विभागाचे कर्मचारी धावले असता सागवान चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला आणि तीन सायकल सह १७ सागवान चौरस याची किंमत सायकल सह २९ हजार रुपये आहे

सदर किमतीचा माल त्यावेळी जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपीच्या विरुद्ध पातुर वन विभागाने गुन्हा नोंदविला आहे सदरची कारवाई वनरक्षक आर के बोराळे, आर एस काकडे, एन ए सावळे यांनी पार पाडली पुढील तपास अकोला वन विभागाचे उप वनरक्षक कुमार स्वामी एस आर, सहाय्यक वनरक्षक सुरेश वडोदे, पातुर वनपरिक्षेत्र अधिकारी एस डी गव्हाणे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे पातुर वनपरिक्षेत्रामध्ये वनगुन्हया संबंधी काहीही माहिती असल्यास वन विभागाला कळविण्याचे आव्हान यावेळी वन विभागातर्फे करण्यात आले आह