देश

पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

१२ डिसेंबर मुंबई: मध्य प्रदेशनंतर आता भाजपने राजस्थानमध्ये दुसरा धमाका केला असून पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधराराजे शिंदे यांना बाजूला करून भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. भजनलाल शर्मा हे भरतपूरचे असून ते सांगानेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप असतानाही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८,०८१ मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात.

भजनलाल शर्मा हे ब्राह्मण समाजातील आहेत. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजप आणि आरएसएसमध्ये दीर्घकाळ काम केले. राजस्थानमधील लोकसंख्येपैकी सुमारे ७ टक्के लोक ब्राह्मण आहेत. राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे.

दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री, तर वासुदेव देवनानी हे विधानसभेचे अध्यक्ष असतील.भजन लाल शर्मा हे भरतपूर येथील रहिवासी आहेत. ते दीर्घकाळापासून भाजपच्या संघटनात कार्यरत आहेत. प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलेय. जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून भाजपने त्यांना पहिल्यांदाच निवडणूक लढवायला लावली. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजन लाल शर्मा यांना उमेदवारी दिली होती.

सांगानेर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भजन लाल शर्मा विजयी झाले. त्यांना १,४५,००० इतकी मते मिळाली होती. भजनलाल यांनी काँग्रेसच्या पुष्पराज भारद्वजयांचा पराभव केला होता. संघटनेतील महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देत भाजपने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भजन लाल शर्मा हे भरतपूर येथील रहिवासी आहेत.

ते दीर्घकाळापासून भाजपच्या संघटनात कार्यरत आहेत. प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलेय. जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून भाजपने त्यांना पहिल्यांदाच निवडणूक लढवायला लावली. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजन लाल शर्मा यांना उमेदवारी दिली होती.

सांगानेर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भजन लाल शर्मा विजयी झाले. त्यांना १,४५,००० इतकी मते मिळाली होती. भजनलाल यांनी काँग्रेसच्या पुष्पराज भारद्वज यांचा पराभव केला होता. संघटनेतील महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देत भाजपने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.