अकोला

मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय थांबवा – उमेश इंगळे

१५ डिसेंबर अकोला : मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयास रिक्त पदाचे ग्रहण लागले असून, सध्या एकूण १९ पदे रिक्त आहे. या व्यतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक हे महत्त्वाचे पदच रिक्त असून, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांचीही वानवा आहे.मूर्तिजापूर शहर व परिसरातील १६० खेड्यांची नाळ उपजिल्हा रुग्णालयासोबत जुळली आहे.

एक लाख ७४ हजार ६५० नागरिक या तालुक्यात वास्तव्यात आहे. ही आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार असून, यामध्ये आता बरीच वाढ झाली आहे. परंतु, तज्ज्ञांची कमतरता आणि औषधीचा कधीकधी होणारा तुटवडा या कारणामुळे रुग्णांना औषधी बाहेरून खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या रुग्णालयात काही प्रमाणात औषधांचा तुटवडा, तज्ज्ञांचा वानवा, अत्याधुनिक सुविधांचा अभाव आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.तालुक्यातील रुग्णांसह परिसरात रुग्ण विविध उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात येतात तसेच राष्ट्रीय महामार्गावर विविध अपघातातील रुग्णांना याच रुग्णालयात दाखल करण्यात येते. मात्र, कधी-कधी रुग्णांना अकोला रेफर करण्यात येते.या रुग्णालयात काही प्रमाणात औषधांचा तुटवडा, तज्ज्ञांचा वानवा, अत्याधुनिक सुविधांचा अभाव आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.

या रुग्णालयात शस्त्रक्रिया तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी नाही. भीषक तज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सा तज्ज्ञ नाही. त्याचप्रमाणे दंतशल्य चिकित्सक वर्ग दोन अधिकारी नाही. प्रशासकीय अधिकारी वर्ग दोनचे एक पद रिक्त आहे. अधिपरिचारिकांची चार पदे रिक्त आहे. क्ष-किरण तंत्रज्ञ नाही, औषधी निर्माताचे एक पद रिक्त आहे. कार्यालयीन अधीक्षक पद रिक्त आहे. वरिष्ठ लिपिकाचे पद रिक्त आहे. अपघात विभागाची तीनही पदे रिक्त आहेत.

सहायक गट पद रिक्त आहे, असे एकूण १९ पदे रिक्त आहे.तालुक्यातील रुग्णांसह परिसरात रुग्ण विविध उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात येतात तसेच राष्ट्रीय महामार्गावर विविध अपघातातील रुग्णांना याच रुग्णालयात दाखल करण्यात येते.

मात्र, कधी-कधी रुग्णांना अकोला रेफर करण्यात येते. म्हणून लवकरात लवकर ही पदभरती करून औषधी उपलब्ध करून देण्यात यावी व रुग्णांची होणारी गैरसोय थांबवावी अन्यथा आम्ही तिव्र आंदोलन छेडु यांची नोंद घ्यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार, डॉ तरंग तुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्स तथा उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ अकोला तथा डॉ बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ईमेल तथा आपले सरकार पोर्टल वर केलेल्या तक्रारी द्वारा केली आहे.