ताज्या बातम्या

राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशनाचे शरद पवारांनी निमंत्रण स्वीकारले !

नवी मुंबई : खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर नऊ दिवस चालणा-या भव्य दिव्य अशा राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन आणि अखंड हरीनाम सप्ताहाची जोरदार तयारी सुरू असून, आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना या सोहळयाचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या सोहळयासाठी संत, महंत आणि सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनी निमंत्रण स्वीकारून या सोहळयास उपस्थित राहण्याची मान्यता दर्शविली. शरद पवार यांना निमंत्रण देतेवेळी माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, हभप संतोष दादा केणे, हभप पुंडलिक महाराज  फडके, गोरक्षण महाराज गाडगे, राहुल केणे, हभप अरुण महाराज वायले,  रायगड काँग्रेस अध्यक्ष आर. सी. घरत, हेमराज म्हात्रे,  पनवेल युथ काँग्रेस अध्यक्ष  सुदाम पाटील, हभप अरुण महाराज हीलाल, ह. भ.प. एकनाथ महाराज कडव, ह.भ.प. नारायण म्हात्रे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. रायगड ठाणे नवी मुंबई वारकरी संप्रदाय यांच्यावतीने ४ फेब्रुवारी ते  १२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सेंट्रल पार्क मैदान खारघर येथे प्रथमच राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयेाजन करण्यात आले आहे. या  नऊ दिवस चालणा-या या महाअधिवेशनात भारताच्या चारही पिढाचे पिठाधिश्वर  जगदगुरू शंकराचार्य,  सकल संताचे वंशज, ज्येष्ठ कीर्तनकार, वारकरी व फडकरी यांच्या पवित्र उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा हेाणार आहे. या महाअधिवेशनात संतवीर  श्रीगुरू हभप बंडातात्या महाराज कराडकर यांच्या उपस्थितीत आणि श्रीमद भागवत कथा प्रवक्ते श्री गुरू हभप चंद्रशेख महाराज देगलूरकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमदभागवत कथा, महापुराण कथामृतांचे रसपान होणार आहे.  दररोज एक लाख भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.​तसेच या भव्य दिव्य अधिवेशनात ५००० टाळकरी, ५००० ज्ञानेश्वरी वाचक, ३ हजार मृदंगवादक​  उपस्थित राहणार आहेत.