road-accident
ताज्या बातम्या

परभणी : भीषण अपघातात 3 ठार 6 जखमी

परभणी, १७ डिसेंबर : परभणीत देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त भाविक जालना जिल्ह्यातील परतुर येथील असून ते यशवाडी येथील मंदिरात दर्शनासाठी आले होते.

जालना जिल्ह्यातील परतुर येथील ब्राह्मण वाडीचे एकूण 9 जण परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर परत जात असताना पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ ट्रॅक्टर आणि क्रुझरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातानंतर गाडीचा चेंदामेंदा झाला असून स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांची सुटका करण्यात आली. या अपघातात गाडीतील अमोल मारुती सोळंके, अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके, दिगंबर भिकाजी कदम या 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कृष्णा सखाराम सोळंके, उमेश भारत सोळंके, संतोष कुंडलिक पांचाळ, अविनाश चंदू पाटील सोळंके, दशरथ सुदामराव, किशोर सोळंके हे 6 जण जखमी झाले असुन, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.