ताज्या बातम्या

राज्यासह देशभरात दुसऱ्या टप्प्यांचे मतदान सुरू

तुमचे मत, तुमचा आवाज; मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान मोदींचे मराठीत ट्विट

अकोला – लोकसभा निवडणुक एकूण सात टप्प्यात होत आहे. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आजे देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या टप्प्यात आज अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांत, आज मतदान होत असलेल्या मतदार संघामधील सर्वांना विक्रमी संख्येने मतदानासाठी सहभागी होण्याचे आवाहन करतो, मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते, विशेषत आपल्याल युवा आणि महिला मतदारांनी मोठया संख्येने मतदान करावे असे आवाहन देशभरातील मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

अमरावती, अकोला लोकसभा निवडणुक देशभरासाठी ओत्सुक्यांची
अमरावती लोकसभा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहे. अमरावती मध्यें 37 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यात भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे व प्रहारचे दिनेश बुब यांच्यात यांच्यात लढत होणार आहे. तर अकोला जिल्हयात महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. अभय पाटील, महायुतीच्या वतीने माजी मंत्री संजय धोत्रे यांचे चिंरजीव अनुप धोत्रे मैदानात आहेत तर तिसरीकडे वचिंत बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर स्वत: अकोला येथून मैदानात आहेत.