ताज्या बातम्या

बाळासाहेब असते तर संजय राऊत यांना जोड्याने हाणले असते

ठाणे – नवनीत राणा यांच्या संदर्भात संजय राऊत यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली.जर बाळासाहेब ठाकरे असते तर या राऊताला जोड्याने हाणले असते. महाविकास आघाडीला लाज आणणारी वक्तव्ये संजय राऊत यांनी केलेली आहेत. एखाद्या महिलेला नाची म्हणणे, तुम्हाला डोळे मारेल, बोलवेल अशी विधाने हा पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. हा शिवछत्रपतींचा, जिजाऊ, सावत्री, रमाईचा महाराष्ट्र आहे ना मग याच महाराष्ट्रात महिलांचा असा अपमान होताना उद्धव ठाकरे गप्प का आहेत? कित्येकवेळेला महिला सन्मानाची बात करणाऱ्या सुषमा अक्का कुठे आहात तुम्ही? या महाराष्ट्रातील दमलेल्या बाबांच्या लेकी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे मूग गिळून का बरं गप्प आहात? का फक्त स्वत:ची बुलंद कहाणी लिहण्यात व्यस्त आहेत.

लक्षात ठेवा रावण सुद्धा महाविद्वान होता. पण सीतामाईचा अपमान केला आणि रावणाची सोन्याची लंका जळाली.सामर्थ्यवान असणारं हस्तिनापूरसुद्धा द्रौप्रदीच्या अपमानाने उद्धस्त झालं होते आणि महाविकास आघाडीची लंका ही संजय राऊताच्या अशा बेताल बडबडीमुळेच जळून जाणार आहे. कारण महाराष्ट्राला महिलांचा अपमान सहन होणार नाही. इथून पुढे जर संजय राऊत एखाद्या महिलेला नाची म्हणणार असतील तर संजय राऊत तुम्हाला महाविकास आघाडीचा नाचा म्हणायचे का? महाराष्ट्रातील महिला संजय राऊत याची जोड्याने पुजा बांधतील, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केली.