महाराष्ट्र

‘राहुल गांधींची 26 पक्षांची खिचडी अन् खिचडी

मुंबई – ‘राहुल गांधींना त्यांच्या खिचडीचे लोकं देखील नेता मानायला तयार नाहीत. परवा कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधी हे अपरिपक्व आहेत. ते देशाचं नेतृत्व करु शकत नाहीत. त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे की, राहुल गांधी यांना नेता मानायला शरद पवार तयार नाहीत आणि उद्धव ठाकरे ऐकणार नाहीत. आता तर संजय रऊत यांनी घोषित करुन टाकलं की, देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरे होणार आहेत. आता मला सांगा, ज्यांची एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाहीत ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का?’ असा सवाल करत फडणवीसांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तर ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुणी जाईल का? कुणीच जाणार नाही, असा देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला. पुढे ते असेही म्हणाले की, परवा शरद पवार आले होते. शरद पवार म्हणाले, मागच्या वेळेस नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता याबद्दल माफी मागतो. तुम्हाला माफी मागायची असेल तर विदर्भाची मागा, कारण तुम्ही सातत्याने विदर्भावर, अमरावतीवर अन्याय केला.