क्राईम

अकोट : सप्त खंजिरी माझा प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे फेसबुक अकाउंट हॅक

१४ डिसेंबर अकोट : महाराष्ट्राचे सप्तखंजेरीवादक, प्रबोधनकार सत्यपाल महाराज या नावाचे फेसबुक पेज हॅक झाले असून सदर पेज बंद करण्यात यावे.तसेच घडलेल्या प्रकारची शहानिशा करावी अशी तक्रार सत्यपाल महाराज यांचे चिरंजीव डॉ. धर्मपाल सत्यपाल चिंचोळकर यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

या तक्रारीत माझे वडील प्रबोधनकार सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर ( सत्यपाल महाराज ) हे समाज प्रबोधनकार असून त्यांच्या सामाजिक प्रबोधन कार्यक्रमांचा व इतर सामाजिकउपक्रमांचा व्यापक प्रचार प्रसार व्हावा या अनुषंगाने सोशल मीडियाच्या फेसबुक या माध्यमातून आम्ही सत्यपाल महाराज फेसबुक पेज तयार केले आहे.

मी बदनाम कसा होईल याकरिता षंडयत्र रचून माझ फेसबुक पेज हँक करण्यात आले. या पेजवर स्टोरी व फोटो कोणी टाकले माहिती नाही. या घटनेशी माझा काहीही संबध नाही. -सत्यपाल महाराज,प्रबोधनकार

सदर फेसबुक पेज सत्यपाल महाराज या व्यक्तिगतफेसबुक अकाउंट ला लिंक आहे. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी फेसबुक पेज वरून एक अश्लील पोस्ट केलेली दिसून आली ती पोस्ट बघून आम्ही सर्व अचंबित झालो पोस्ट तात्काळ हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतू आमचे वैयक्तिक अकाउंट ला वापरण्याचे अधिकार बंद झाल्याचे दिसून आले.

याबाबत आणखी माहिती घेतली असता असे लक्षात आले की, आमचे फेसबुक पेज हे हॅक झाले आहे. सदर फेसबुक पेज वरून यानंतर कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा अश्लील पोस्ट शेअर झाल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही सदर फेसबुक पेज आपल्या स्तरावरून बंद करण्यात यावे व घडलेल्या प्रकारची शहानिशा करावी. असे नमूद केले आहे.

अकोट शहर पोलीसांनी पुढील कारवाई करीता ही तक्रार अकोला येथे सायबर क्राईम कडे पाठवली आहे. दरम्यान सत्यपाल महाराज यांचे फेसबुक अकाउंट हँग करून असतील पण केल्याबद्दल महाराजांच्या अनुयायांमध्ये संताप व्यक्त होत आहे.