अकोला

शहर वाहतूक नियंत्रण शाखा ‘इन अ‍ॅक्शन मोड’, अकोला शहरातील प्रमुख मार्गांवर वाहनांची तपासणी

१४ डिसेंबर अकोला : शहर वाहतूक नियंत्रण शाखा आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. गुरुवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी व अधिकारी तैनात दिसत होते.

यावेळी वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रत्येक वाहन थांबवून त्याची तपासणी केली.

यावेळी चालकांचे परवाने व वाहनांची कागदपत्रे तपासण्यात आली. पुरेशी कागदपत्रे व परवाने नसलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

त्यामुळे वाहनचालकांमध्ये घबराट पसरली होती. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी व कर्मचारी शहरातील प्रत्येक चौकात कर्तव्य बजावताना दिसत होते. या प्रकारावर दररोज कारवाई झाल्यास प्रत्येक वाहनचालक नियम पाळून वाहन चालवतील. हेच अपेक्षित आहे.