अकोला

मुर्तीजापुर येथे सापडले नवजात अर्भक

अकोला – मूर्तिजापूर येथील हरिया नगर परिसरातील कावरे संकुल मध्ये असलेल्या एका सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीत नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी वस्ती मुख्य रस्त्यावर हरिया नगर स्थित असलेल्या कावरे संकुलातील जय सोनोग्राफी सेंटर लगतच्या नाली मध्ये एक नवजात अर्भक मृत अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जय सोनोग्राफी सेंटर येथील कर्मचारी मनीषा राम दुरतकर ह्या दररोज प्रमाणे सोनोग्राफी सेंटरची साफसफाई करत असताना त्यांना दुर्गंधी येत असल्याचे जाणवले त्या वरून त्यांनी इतरत्र शोध घेतला असता जय सोनोग्राफी सेंटरच्या लगतच असलेल्या नाली मध्ये निळ सर लाल रंगाच्या साडीच्या बाजूला एक नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. सदर मृत अर्भकाचे काही अवयव जनावराणे खाल्ल्याने ते पुरुषाचे की महिलेचे कळू शकले नाही.
याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेऊन श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मुर्तीजापुर येथे पाठविले आहे.

विशेष म्हणजे याच हरियाणा नगर स्थित परिसरात शहरातील नामांकित स्त्रीरोगतज्ञ डॉ विक्रम शर्मा यांचे श्रीमती सुशिलाबाई शर्मा प्रसुतीगृह, बालरोग तज्ञ डॉ प्रशांत अवघाते यांचे रुग्णालय तर बाजूलाच डॉ. बुब यांचे हॉस्पीटल व जय सोनोग्राफी सेंटर आणि हाकेच्या अंतरावर उपजिल्हा रुग्णालय अशा भल्या मोठ्या परिसरात अशी धक्कादायक बाब होणे ही चिंतेचा विषय असून नागरिकात फार मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे आणि यावर तर्कवितर्क लावत कोणी आहे एका दवाखान्यावर संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे अशा नवजात बालकास जगात आल्यानंतर त्याच्या स्वप्नाची राख रांगोळी करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे नागरिकात बोलल्या जात आहे.त्या मात्यापित्यासह संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरवरही कठोर कारवाई होण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.