अकोला

भारत विद्यालयाच्या मैदानात महिला मुलींसाठी लाठी काठी प्रशिक्षण

अकोला – महिला,मुलींमध्ये आत्मरक्षण करण्यासाठी लागणारे कसब निर्माण व्हावे यासाठी स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनच्या वतीने दिनांक २ एप्रिल पासून नित्य सायंकाळी ५-३० वाजता स्थानीय भारत विद्यालयाच्या मैदानात लाठी काठी प्रशिक्षण शिबिर प्रारंभ होत आहे. या लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक उज्वला देवकर यांच्या हस्ते तथा विवेकानंद इंग्लिश हायस्कूल तापडिया नगरच्या मुख्याध्यापिका संगीता कोकीळ यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या शिबिरात तज्ञ प्रशिक्षक एक हजार महिला, मुलींना लाठी काठी व शिवकालीन शस्त्रांचे प्रशिक्षण देणार आहेत. सर्वांसाठी मोफत असणार्‍या या प्रशिक्षण शिबिराचा मातृ शक्तींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.