ताज्या बातम्या

“खासदार म्हणून १० वर्षे मुंबई नेतृत्वांची संधी मिळाली मी सदैव ऋणी

मुंबई – भाजपाने उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकिट कापलं आहे. पूनम महाजन यांच्या ऐवजी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांना तिकिट दिल्यानंतर भाजपाने उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांनी पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“खासदार म्हणून मी मागची १० वर्षे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मला दिली. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देते. खासदार म्हणून नाही तर मुलीप्रमाणे मला त्यांनी स्नेह दिला. मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील कुटुंबीयांची, जनतेची ऋणी राहिन, तसंच आशा करते की आपलं नातं कायम टिकून राहिल. माझे दैवत, माझे दिवंगत वडील प्रमोद महाजन यांनी मला राष्ट्रप्रथम मार्ग दाखवला. तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल.” या आशयाची पोस्ट पूनम महाजन यांनी केली आहे.