अकोला, 19फेब्रुवारी: तरुणाई फाउंडेशन कुटासा व श्री शिवाजी महाविद्यालय मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या तिसऱ्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनामध्ये पत्रकार मनीष खर्चे यांना दर्पणकार पत्रकाररत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे,ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे, डॉ.विनय दांदळे, डॉ.रावसाहेब काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.पत्रकार मनीष खर्चे हे मागील दोन दशकापासून पत्रकारिता करीत असून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक विषयांवर विकासात्मक पत्रकारिता केली आहे पुरस्कारासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.