अकोला

अकोट जिजामाता नगरातील हल्ला प्रकरण; हिंदुत्ववादी संघटनेतर्फे निवेदन सादर

१५ डिसेंबर अकोट: अकोट शहरातील जिजामाता नगरात दि.१२ डिसेंबर रोजी काही समाजकंटकांकडून हिंदू परिवाराला लक्ष करीत धारदार शस्त्र आणि लाठ्यांनी हल्ला करण्यात आला. या घटनेचा आज हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध नोंदवत आरोपींविरोधात कठोर कारवाई ची मागणी केली आहे.

दरम्यान यासंदर्भात उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दि.१२ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजता जिजामाता नगर येथे काही युवकांनी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली होती.याचा प्रतिकार करायला गेलेल्या परिवाराला २५ ते ३० जणांनी धारदार शास्त्रासह लाठ्यांनी हल्ला चढवला.यामध्ये घरातील महिला, अल्पवयीन मुलं, पुरुषांना अमानुषपणे मारहाण करण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शहर पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असले तरी या प्रकरणात घरात घुसण्याचा प्रयत्न केला असल्याचे कलम वाढ करावे. आरोपींना अटक केली असली तरी या प्ररकरणातील काही आरोपी अद्यापही फरार असून त्यांना अटक करीत कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.या प्रकरणात पीडित कुटुंब स्वतः हजर राहत घटनेची पूर्ण आपबीती उपविभागीय अधिकारी अकोट यांच्या समक्ष कथन केली आहे.निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल सह इतरही हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.