१५ डिसेंबर अकोला : मुंबई येथील धम्मदीक्षा सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन रिपाई आठवले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना वासनिक यांनी केले आहे. रेस कोर्स मैदान, महालक्ष्मी, मुंबई येथे १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माचा दीक्षा समारंभाचा समारोप होताना एक संकल्पना केली होती की, १६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईमधील रेस कोर्स मैदानावर दीक्षा समारंभ घेण्यात येईल व त्या कार्यक्रमाची सर्व स्तरातून सर्वांनी मिळून जोरदार तयारी सुरू केली होती, परंतु ६ डिसेंबर १९५६ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले आणि तो कार्यक्रम राहून गेला.
गेल्या ६७ वर्षामध्ये कोणत्याही नेत्यांने, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषणा पूर्ण करण्याचे धाडस दाखविलेले नाही, केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले , सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री भारत सरकार, यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. अशा ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल आणि त्यांची सुवर्ण अक्षराने नोंद केली जाईल. या कार्यक्रमात जगभरातून १५ ते २० देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे.
तसेच या कार्यक्रमास जागतिक पातळीवरील बौद्ध धम्म गुरु दलाई लांमा हें देखील उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास अकोला जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहसंघटक अशोक नागदेवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वासनिक, जिल्हा महासचिव पद्माकर वासनिक, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष ब्रह्मानंद प्रधान, जिल्हा उपाध्यक्ष विनोद गोपनारायण, किरण वानखडे, अरुणा लबडे, सरिता इंगळे, अलका डोंगरे, नंदिनी वानखडे, मनोज इंगळे, संतोष लबडे, दादाराव वानखडे, गौतम उमाळे, मिलिंद गावंडे, मनीष पिल्ले, सुनील अण्णा गुंजाळ, रमेश अण्णा गुंजाळ, अमित शिरसाट, बुद्धभूषण डहाने, दीपक जंजाळ, विनोद जंजाळ, जय वाहूरवाघ, रोहित इंगळे, शुभम मेश्राम, अभिषेक मानकर, स्वप्निल लबडे, संस्कार ढोके, समर्पण ढोके, इत्यादींनी केले आहे.