महाराष्ट्र

जयंत पाटलांनी शिंदे गटाचे आ.यड्रावकरांची भेट घेतली

कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज सकाळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. राजेंद्र पाटलांच्या जयसिंगपूरमधील निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीवेळी जयंत पाटलांचे पुत्र प्रतिक पाटीलही उपस्थित होते.

या भेटीमध्ये जयंत पाटील यांनी हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना मदती करण्यासाठी राजेंद्र यड्रावकरांना साकडे घातले. हातकणंगले मतदारसंघातून शिंदे गटाचे धैर्यशील माने उमेदवार आहेत. मात्र धैर्यशील माने यांच्या नावाला मोठा विरोध सुरु आहे. हातकणंगले लोकसभेसाठी राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव देखील चर्चेत होते. परंतु शेवटच्या क्षणी शिंदे गटाकडून पुन्हा धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली. अशातच आता जयंत पाटील यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.