मुंबई

ठाण्यात निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चंद्र प्रकाश मीना व राहील गुप्ता

ठाणे –  २५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) व  राहिल गुप्ता (आयआरएस) यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने या दोघांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. चंद्र प्रकाश मीना व राहील गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. चंद्र प्रकाश मीना हे भारतीय महसूल सेवेतील (IRS) २०१० च्या बॅचचे अधिकारी आहेत. मीना हे २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील १४८ – ठाणे, १५० – ऐरोली, १५१ बेलापूर या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील.

गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील (IRS) २०१२ च्या बॅचचे अधिकारी असून ते २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील १४५ मिरा-भाईंदर, १४६ ओवळा-माजिवडा, १४७ कोपरी-माजिवडा या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील.