ताज्या बातम्या

नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे की का?

पालघर – महाराष्ट्रात येऊन तुम्ही ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला, त्या शिवसेनेला नकली म्हणता? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे की काय?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारला. ठाकरे गटाच्या (महाविकास आघाडी) उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी बोईसर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. घेतली.

ठाकरे पुढे म्हणाले, भाजप हा भेकड पक्ष आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आपली शिवसेना फोडली. तपास यंत्रणांची बंदूक डोक्यावर लावली. ते गद्दार इथून पालघरमधून गुजरातला गेले होते, आता मी बघतो आता कोण गद्दार जाईल तेच बघायला आलो आहे.

मी तुम्हाला वचन देतो, भारतीताई तुमच्या आशीर्वादाने लोकसभेत जाणार आहेत. त्यानंतर सर्वांत आधी वाढवण बंदराचा फडशा पाडणार आहे. वाढवण बंदर झालं तर ते कुणाच्या घशात जाईल? विकास कुणाचा होणार? माझ्या मच्छीमार लोकांचं काय होणार? म्हणून आता वेळ आलेली आहे. भाजप-शिवसेनेला आताच गाडायचं. गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत, या महाराष्ट्र द्रोह्यांना आता पराभूत कराच, असे आवाहन ठाकरे यांनी केले.