मुंबई

पहिल्या दिवशी 43 नामनिर्देशनपत्रांचे वाटप

ठाणे – ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या 20 मे 2024 रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी आज (दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी) सकाळी 10 वाजल्यापासून नामनिर्देशन अर्ज देण्यास सुरूवात झाली आहे. आज दुपारपर्यंत एकूण 43 नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज दिले जात आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून विविध पक्षाच्या उमेदवारांच्या 25 प्रतिनिधींनी नामनिर्देशन पत्र घेण्यासाठी हजेरी लावली होती. दुपारपर्यत एकूण 43 नामनिर्देशनपत्र देण्यात आले. यात भारतीय राजनिती विकास पार्टी 1, आम आदमी पार्टी 1, अपक्ष 19, भूमीपुत्र पार्टी 1, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी 2, बहुजन शक्ती 1, संयुक्त भारत पक्ष 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 4, हिंदुस्थान मानव पक्ष 1, रिपब्लिकन बहुजन सेना 2, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक 3, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी 2, बहुजन मुक्ती पार्टी 2, भारतीय जवान किसन पार्टी 2 आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नामनिर्देशन पत्रे घेऊन गेले आहेत.