ताज्या बातम्या

अखिल भारतीय कोळी समाजाची निवडणूक भुमिका, कार्ला लोणावळा येथे सभेचे आयोजन

ठाणे – राज्यासह देशभरात लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू आहे . या आणि आगामी निवडणूकीत कोळी समाजाची काय भूमिका असावी यां बाबत कार्ला लोणावळा अखिल भारतीय कोळी समाज संस्था यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन रविवार दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केदार लखेपुरिया यानी दिली आहे.

निवडणुकीत कोळी समाजाचं अजेंडा काय असावा या बाबत चर्चा करून कोळी समाजाचे मागणी पत्र या सभेत जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील राजकीय अस्थिरता पाहता आगामी निवडणूक राज्यातील कोळी समाजाचे प्रबळ दावेदारी असलेल्या मतदार संघात कोळी समाजाचे उमेदवार निवडणूकीत उभे करता येतील काय यावर या सभेत चर्चा करण्यात येईल अशी माहीती सरचिटणीस अॅड. सचिन ठाणेकर यांनी दिली आहे.

कोळी समाजाच्या युवकांना सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम बनविणे ही अखिल भारतीय कोळी समाजाची भुमिका असून कार्ले येथे होणाऱ्या सभेत कोळी युवकांची सामाजिक ,व्यवसायिक आणि राजकीय यां विषयावर चर्चा करून योग्य दिशा ठरविण्यात येईल अशी माहिती प्रदेश युवाध्यक्ष अॅड. मनोज बोईनवाड यांनी दिली असून राज्यातील अधिकाधिक समाज बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश युवा सरचिटणीस अजिंक्य पाटील यांनी केले आहे.