देश

बिग बींचा सेटवरच जोरदार वाद

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशाह, बिग बी अमिताभ बच्चन हे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. अमिताभ बच्चन हे वयाच्या 81 व्या वर्षीदेखील चांगलेच सक्रीय आहेत. अमिताभ बच्चन हे सेटवर वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. नवख्या दिग्दर्शकांनासोबतही ते सहजपणे काम करतात. सेटवर अमिताभ बच्चन काहीवेळेस आपल्या सूचना देत असल्याचे म्हटले जाते. अशाच एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांचे एका सीनच्या शूटवरून दिग्दर्शकासोबत जोरदार वाजले होते. मात्र, त्यानंतर रात्री अमिताभ यांनी पुन्हा दिग्दर्शकाला फोन केला. अमिताभ बच्चन यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या सेकंड इनिंगमध्ये जोरदार कमबॅक केले.बिग बींनी आपल्या सेकंड इनिंगमध्येही संस्मरणीय भूमिका साकारल्या. अमिताभ बच्चन यांना सेटवर सहसा राग येत नाही. पण, ज्यावेळी राग येतो तेव्हा तो खूपच वाईट असतो असे त्यांना ओळखणारे सांगतात. 19 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, त्यांचा त्याच्याच दिग्दर्शकाशी वाद झाला.