अमरावती

थकीत बिलासाठीचे फेक कॉल ओळखा: महावितरण

अमरावती – वीज बिलासंदर्भातही आता फेक कॉल करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अलीकडच्या काळात फेक कॉल करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. महावितरणकडून बोलत आहे, तुमचे मागील महिन्याचे वीज बिल भरले नाही, तर लाइट कट होईल, असे सांगून वीजबिल भरण्याच्या सूचना

Read more
ताज्या बातम्या

नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे की का?

पालघर – महाराष्ट्रात येऊन तुम्ही ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला, त्या शिवसेनेला नकली म्हणता? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे की काय?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारला. ठाकरे गटाच्या (महाविकास आघाडी) उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी बोईसर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

Read more
खान्देश

जळगाव जिल्ह्यातील ९८५ शस्त्रे पोलिसात जमा

जळगाव – जिल्ह्यात एकूण १ हजार ३२३ परवानाधारक शस्त्र असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश दिल्यानंतर आज पर्यंत ९८५ शस्त्र विविध पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. तर ११५ शस्त्रधारकांना सूट देण्यात आली आहे. चार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तर दोन परवाने रद्द करण्यात आले आहेत. अद्याप पर्यंत २७

Read more
देश

अनिल अंबानी यांना धक्का ८ हजार कोटी बुडाले

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) ने अनिल अंबानी यांच्या दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड (डीएएमईपीएल) ला दिलेल्या मूळ लवादाची संपूर्ण रक्कम परत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अनिल अंबानी यांची कंपनी दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेसला आता डीएमआरसीला ८ हजार कोटी द्यावे लागणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनिल अंबानींना मोठा

Read more
ताज्या बातम्या

आताचे महाराज दत्तक आलेले; ते खरे वारसदार नाहीत

कोल्हापूर – आताचे महाराज दत्तक आलेले आहेत. ते कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहे, असे मत खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त करीत कोल्हापुरातील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्यावर टीका केली. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सभा झाली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

Read more
महाराष्ट्र

ओझर येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

ओझर – शिरोली खुर्द तालुका जुन्नर येथील पाटील मळा वस्तीवरील संपत केरू मोरे यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांच्या लहान मुलीला बिबट्याने पळवून नेत तिच्यावर हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. ही घटना काल पहाटे घडली. या घटनेनंतर गावातील व परिसरातील नागरिकही मोठया संख्येने जमले. त्यांनी आजूबाजूच्या शेतात मुलीचा शोध घेतला. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला

Read more
मनोरंजन

सलमान खानच्या घराबाहेर लोकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई – अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली आहे. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची बातमी समोर आली आहे. आज रमजान ईद आहे. त्यामुळे सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली आहे. सलमान खान वांद्रे येथील बँडस्टँड भागात राहतो. सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणावर जमले आणि पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

Read more
देश

‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनला दिलासा! केरळ न्यायालयातील कार्यवाहीवर स्थगिती

तिरुवनंतपुरम -‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिन विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये केरळच्या पीएमएलए न्यायालयात सुरु असलेल्या कार्यवाहीवर सर्वोच्च न्यायालयाने काल स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मार्टिनला दिलासा मिळाला आहे. या खटल्याला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणासंदर्भात ईडीचे म्हणणे काय? त्याची माहिती मागवली. गेल्या काही दिवसांपासून मार्टिनच्या विरुद्ध केरळच्या पीएमएलए न्यायालयात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा खटला सुरु होता.

Read more
राजकीय

‘राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने सामान्य माणूस संभ्रमात’

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर सामान्य लोक आणि मनसे कार्यकर्ते काहीसे संभ्रमात आहेत. महायुतीकडून राज ठाकरेंचे आभार मानले जात आहेत. तर महाविकास आघाडीकडून टीका होते आहे. आज पहिल्यांदाच शरद पवारांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य

Read more
विदर्भ

मुनगंटीवार यांच्या अडचणीत प्रचंड वाढ

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी १९८४ च्या शीख दंगलीवरून भाऊ-बहिणीच्या नात्याचे उदाहरण देऊन केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच अडचणीत आणणारे ठरत आहे. काँग्रेसने ही नामी संधी हेरून आपल्या प्रचारात या वक्तव्याचा आधार घेत मते मागायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतदार काँग्रेसच्या या प्रचाराचे मतात रूपांतर करतात की भाजपची

Read more