अमरावती – भातकुली पोलीस यांना माहिती मिळाली कि होशांगाबाद ( मध्यप्रदेश ) येथील जेल मधून पॅरोल वर बाहेर आलेला व पॅरोल संपल्यावर जेलमध्ये परत न जाता आरोपी नामे तिवारी दामू इवने (30, रा. सायखेड बैतुल) हा फरार झालेला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण वांगे,पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश बोरकुटे ब. न. 871, पोलिस कॉन्स्टेबल सागर चव्हाण ब. न 989, चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय मालकुटे ब. न 306 यांनी आज दि २४ जुलै रोजी सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन मध्यप्रदेश पोलीस यांच्या स्वाधीन केले.
सदर ची कार्यवाही पोलीस आयुक्त नवीनचन्द्र रेड्डी, सहाय्यक पोलीस उपायुक्त गणेश शिंदे,सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्ता भावर, व वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण वांगे यांच्या मार्गदर्शनात पो. हे. का राजेश बोरकुटे ब. न 871, पो. का सागर चव्हाण ब. न 989, चालक पो. हे. का अजय मालकुटे बं. न 306 यांनी ही कारवाई केली.