मनोरंजन

अभिनेत्री नोरा फतेही ही कायमच चर्चेत

मुंबई – बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही कायमच चर्चेत असते. नोरा फतेही हिने मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. नोरा फतेही हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नोरा फतेही ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वीच नोरा फतेहीचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आले. यावेळी नोरा फतेही हिच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आले. यानंतर नोरा फतेही हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. नोरा फतेही हिच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले की, आपल्याला फसवण्यासाठी आपले नाव या प्रकरणात घेतले जातंय.

आता नुकताच नोरा फतेही हिने एक मुलाखत दिलीये, या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना नोरा फतेही दिसलीये. नोरा फतेही हिचे हे खुलासे ऐकून लोक हैराण झालेत. विशेष म्हणजे यावेळी बाॅलिवूडमधील काळे सत्य सांगताना नोरा फतेही ही दिसलीये. नोरा फतेही हिने अभिनेत्यांबद्दल खुलासा केलाय.

नोरा फतेही हिच्या या खुलाश्यानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. नोरा फतेहीने बाॅलिवूड अभिनेत्यांवर गंभीर आरोप केलेत. नोरा म्हणाली की, काही दिवसांपूर्वीच एका अभिनेत्याने माझ्यासोबत गैरवर्तन केले. हेच नाही तर हे लोक तुमच्यासोबत गैरवर्तन करतात आणि तुमच्यामागे तुमच्याबद्दल वाईट गोष्टी देखील बोलतात.
नोरा फतेही ही पुढे म्हणाली की, मी इतर मुलींसारखी अजिबातच नाहीये. मी कधीच अभिनेत्यांच्या पुढे पुढे करत नाही. मी मला जे वाटले ते थेट तोंडावर बोलते, यामुळेच ते माझ्याबद्दल पाठीमागे बोलतात. बऱ्याच अभिनेत्यांना वाटते की, मी इथंपर्यंत कशी पोहचले आणि आमच्या मुली इथंपर्यंत का नाही पोहचल्या. याचे त्यांना कायमच वाईट वाटते.

हैराण करणारे म्हणजे नोरा फतेही पुढे म्हणते की, बाॅलिवूडचे असे बरेच अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी केले. पैशांसाठी यांनी लग्न केले. बाॅलिवूडचे कपल्स पैसा, प्रसिद्धी, नेटवर्किंग अशा गोष्टींसाठी पती- पत्नींच्या नात्याचा उपयोग करतात. आता नोरा फतेही हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.