ताज्या बातम्या

अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन, दुपारी अंत्यसंस्कार होणार

मुंबई, 08 डिसेंबर : अभिनेता ज्युनियर मेहमूद यांनी रात्री 2 वाजता त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूपच खराब होती. त्यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवारी) दुपारी सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्युनियर मेहमूदच्या निधनाला त्याचे जवळचे मित्र सलाम काझी यांनी दुजोरा दिला आहे.

सलाम काझी म्हणाले की, 67 वर्षीय अभिनेते ज्युनियर मेहमूद यांना क्वचितच कोणीही नईम सय्यद या नावाने हाक मारते. हे त्याचे खरे नाव होते. त्यांच्यावर परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ज्युनियर मेहमूदच्या संस्मरणीय चित्रपटांमध्ये ‘हाथी मेरे साथी’, ‘कारवां’ आणि ‘मेरा नाम जोकर’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे. उपचारादरम्यान अभिनेते मेहमूद यांनी आपले जुने मित्र जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर सचिन आणि जितेंद्रही त्याला भेटायला गेले. अभिनेता ज्युनियर मेहमूद यांच्या निधनाने इंडस्ट्रीला दु:ख झाले आहे. हे उपनाम नईम सय्यद यांना ज्येष्ठ कॉमेडियन मेहमूद यांनी दिले होते.

आपल्या अभिनय कारकिर्दीत, ज्युनियर महमूदने चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही शोमध्ये काम केले. 1967 मध्‍ये आलेला संजीव कुमारचा ‘नौनिहाल’ हा त्यांच्या करिअरमधील पहिला चित्रपट होता. त्यावेळी तो 11 वर्षांचा होता. यानंतर तो संघर्ष, ब्रह्मचारी, दो रास्ते, कटी पतंग हंगामा, छोटी बहू, दादागिरीसह अनेक चित्रपटांमध्ये दिसला. तो बहुतेक राजेश खन्ना आणि गोविंदा यांच्या चित्रपटांमध्ये दिसला होता.