मुंबई : मुंबईतील शताब्दी रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयातील एका कर्मचार्याने बाथरुममध्ये महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान या प्रकरणात गोवंडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपीला देखील अटक केलीये. तसेच फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमांनुसार हा गुन्हा करुन पुढील तपास सुरु केलाय.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गुप्ता अस अटक केलेल्या आरोपीच नाव आहे. तो शताब्दी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करत आहे. रुग्णालयातील एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार २ डिसेंबर रोजी घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाथरुमध्ये डोकावून महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थिनीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला. याचप्रकरणी मुंबई पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचार्याला अटक केलीये.
शनिवारी ही २७ वर्षीय मुलगी रुग्णालयात एका कॉन्फरन्समध्ये गेली होती. त्यावेळी फ्रेश होण्यासाठी ती तिच्या वसतीगृहात गेली. या वसतीगृहामध्ये पुरुष आणि महिलांचे स्नानगृह शेजारीच असल्याचं एका अधिकार्याने सांगितलं.
मुंबईतील शताब्दी रुग्णालयात २७ वर्षीय मुलगी तिच्या एका कॉन्फरन्समसाठी गेली होती. त्यानंतर प्रâेश होण्यासाठी तिच्या वसतीगृहावर ती आली. त्यावेळी तिचा बाथरुमध्ये एका सफाई कर्मचार्याने व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला.
या वसतीगृहात महिला आणि पुरुषांचे स्नानगृह शेजारी असल्याची माहिती इथल्या एका अधिकार्याने दिली. त्यावेळी महिला अंघोळ करत असताना रुग्णालयातील एका रोजंदारी कर्मचार्याने भिंतींवर चढून तिचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या लक्षात ही बाब येताच तिने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो तिथून पळून गेला.
हा प्रकार लक्षात येताच तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून आरोपीला देखील तात्काळ अटक केली. सध्या या आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. परंतु या संपूर्ण प्रकारावरुन रुग्णालयाच्या प्रशासनावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या या तपासात आणखी कोणत्या गोष्टी उघडकीस येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच रुग्णालयाच्या प्रशासनावर पोलीस कारवाई करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.